मुंबई : मुंबईतील जिमखाने ठरतायेत प्रकाश प्रदूषणाचे स्त्रोत.


जिमखान्यांवर असलेले प्रखर प्रकाश झोत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोठ्या क्रिडांगणांवर किंवा जिमखान्यांवर असलेल्या प्रखर प्रकाश झोतांमुळे प्रकाश प्रदूषणाचा विषय गंभीर झाला आहे. मरिन लाइन्स परिसरात अनेक जिमखाने आहेत. त्यात अत्यंत तीव्र आणि मोठाले प्रकाशझोत बसवलेले आहेत. 


नागरिकांनी केली तक्रार


त्याचा प्रकाश दीड ते दोन किमी अंतरापर्यत जातो. यामुळे या दीड ते दोन किमी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना याचा फार त्रास होतोय. स्थानिक नागरिकांनी याबाबत पोलिस आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. रात्री दहा वाजेपर्यंत हे दिवे बंद करावे असं अपेक्षित आहे, परंतु काही जिमखान्यांची प्रशासनं मात्र रात्री उशिरापर्यंत किवा पहाटेपर्यंत सुरू ठेवतात. यामुळं नागरीकांना निद्रानाशाच्या समस्येला सामोरं जावं लागतय.


प्रदूषणांमध्ये होणारी वाढ


याबरोबरच वेगवेगळी मनोरंजनाची ठिकाणं, विकास प्रकल्प, समारंभ याकरितासुद्धा मोठे प्रकाशझोत वापरले जातात. इतर प्रदूषणांच्या जोडीला आता प्रकाश प्रदूषणाची भर पडली आहे. यासंबंधात कडक कायदे करण्याची गरज नागरिक वेगवेगळ्या स्तरांवर व्यक्त करतात.