मनसे पदाधिकाऱ्यांना सोमवारपर्यंत अटक नाही
ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांना येत्या सोमवारपर्यंत अटक न करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
ठाणे : ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांना येत्या सोमवारपर्यंत अटक न करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
ठाण्यात मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर कारवाई का करु नये याकरता १ कोटी ते २५ लाख रुपये जामिनाची नोटीस ठाणे पोलीसांनी बजावली होती. या नोटीस विरोधात मनसे पदाधिका-यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतील असता न्यायालयानं सोमवारपर्यंत अटक न करण्याचे आदेश ठाणे पोलिसांना दिले आहेत.
मनसैनिक सराईत गुन्हेगार ?
मनसे पदाधिकारी हे सराईत गुन्हेगार आहेत, अनेक वेळा नोटीस बजावून देखील त्यांनी कायदा मोडला असल्याने त्यांनी ही नोटीस बजावण्यात आल्याचं ठाणे पोलीसांकडून सांगण्यात येत असल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांच म्हणणं आहे.
नोटीस नियमबाह्य
हाच मुद्दा मनसेतर्फे न्यायालयात युक्तिवादा दरम्यान मनसे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी मांडला आणि ठाण्यातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर कोणतेही गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल नसून पोलिसांनी बजावलेली नोटीस नियम बाह्य आहे असं सांगून दिलासा देण्याची विनंती केली होती.