ठाणे : एका गृहिणीकडून सामान चोरून तिची हत्या केल्याची घटना महाराष्ट्रातील पालघर जिह्यात २०१३ मध्ये घडली होती. या प्रकरणी ३० वर्षांच्या एका व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. देवेंद्र रामचंदर मिश्रा असे या आरोपीचे नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मृत महिला अंजना राजीव शिंदे (३५) यांच्या पतीने नालासोपारा येथील नारिया नगरमध्ये एक फ्लॅट खरेदी केला. त्या फ्लॅटमध्ये कामानिमित्त एका प्लंबरला बोलवण्यात आले. 


२३ जानेवारी २०१३ मध्ये काम करण्याच्या निमित्ताने मिश्रा फ्लॅटच्या बाथरूममध्ये घुसला. त्यानंतर त्याने महिलेला बाथरूममध्ये खेचले आणि तिच्यावर अवजड वस्तूने वार केला. त्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने तिचा मृतदेह एका रूममध्ये लपवला आणि तिचे दागिने आणि मोबाईल घेऊन फरार झाला. 


परिस्थितीजन्य पुराव्यांनुसार तपास करण्यात आला आणि त्या तपासात खुनाचा छडा लागला.