मुंबई : आपल्या देशात गरजूंना अवयवदानाची असलेली गरज व दात्यांकडूनकरण्यात येणारं अवयवदान याचं समीकरण  फारच व्यस्तच आहे.हे व्यस्त समीकरण बदलण्यासाठी संपूर्ण समाजात जनजागृती होणे महत्वाचे आहे.भारतात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानूसार दरवर्षीसुमारे ५,००,००० माणसांना कोणत्या ना कोणत्या अवयवाची गरज असताना आवश्यक अवयवांच्या अनुपलब्धतेमुळे आपला जीवगमवावा लागतो.ही वस्तुस्थिती बदलायची असल्यास भविष्यात मरणोत्तर अवयवदानाबाबत जनजागृती करणे क्रमप्राप्त आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जीवनविद्या तत्वज्ञानानुसार आपण प्रत्येकजण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपल्यावर अनेकऋण असतात आणि ह्या समाजाचे ऋण फेडण्याचा एक मार्ग आणिसंधी म्हणजे मरणोत्तर अवयवदान.  १३ ऑगस्ट रोजी झालेल्या 'जागतिक अवयवदान दिना'च्या निमित्ताने जनजागृती व्हावी यासाठी 'जीवनविद्या मिशन' तर्फे १२ ते १९ ऑगस्ट दरम्यान'अवयवदान अभियान' राबविण्यात आले. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून रविवार दिनांक १२ ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी ठिक ५वाजता दादर पूर्व रेल्वे स्टेशन विभागात जीवनविद्यामिशन संस्थेतर्फेअवयवदान जनजागृतीसाठी 'मानवी साखळी' करण्यात आली. या मानवी साखळीच्या माध्यमातून समाजात अवयवदानाबाबत जनजागृती करण्याचा जीवनविद्या मिशनचा मानस आहे. या निमित्त १२ ते १९ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या अभियानात आतापर्यत दहाहजारावर लोकांनी या उपक्रमासाठी नोंदणी केली आहे.


या अवयवदानासारख्या सामाजिक उपक्रमात समाजातील मुंबई पोलिसांनी देखील सहभाग घेतला त्याप्रमाणेच शारिरीक व्यंग असलेल्या व्यक्तीने देखील पुढे येऊन अवयव दान अभियनाला आपला पाठिंबा दिला. आतापर्यंत या अभियानाला 10 हजारहून अधिक लोकांनी आपली नोंद केली आहे. तसेच जीवनविद्या मिशन तर्फे अनेक उपक्रम राबवले जातात त्यातील हा एक उपक्रम आहे.