मुंबई : भारताने आज ऐतिहासिक विक्रम केला आहे. देशाने 100 कोटी कोरोना लसीकरणाच्या (Corona Vaccination) आकड्याचा पल्ला अखेर गाठला आहे (100 Crore Vaccination Milestone). 273 दिवसांत देशाने हे 100 कोटींच्या लसीकरणाचं उद्धिष्ठ गाठलंय. यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभरात सेलिब्रेशनची तयारी सुरु केली आहे. देशातल्या 100 ऐतिहासिक वास्तूंवर तिरंगा रूपात विद्युत रोषणाई केली जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

100 कोटी लसीकरण टप्प्यात महाराष्ट्राचा (Corona Vaccination in Maharashtra) वाटा किती आहे, याबाबत आज आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माहिती दिली आहे. देशस्तरावर 100 कोटी लसीकरण झालं, यात राज्याच्या वाटा साडेनऊ कोटींचा असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात आतापर्यंत 70 टक्के लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे, तर दोन्ही डोस दिलेल्यांची संख्या 35 टक्के इतकी असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.  उत्तर प्रदेशला अधिक लस उपलब्ध करून दिल्यानं तिथं सर्वाधिक लसीकरण झाल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.


मिशन युवा स्वास्थ लसीकरण 


राज्यात महाविद्यालय सुरु झाले आहेत. या पार्श्वभूमीवर 25 ऑक्टोबर ते नोव्हेबर दरम्यान युवकांसाठी लसीकरण मोहिम राबवली जाणार आहे. 
सर्व कॉलेजमध्ये लसीकरणाचा स्पेशल ड्राईव्ह राहिल. एकूण पाच हजार कॉलेजस आहेत. यात विद्यार्थ्यांची संख्या 40 लाखांवर जाते. सर्व कॉलेजकडून लसीकरण न झालेल्या विद्यार्थांची संख्या 3 दिवसांत कळेल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. तसंच सर्वाधिक लसीकरण करणाऱ्या कॉलेजना बक्षीसही दिलं जाणार आहे.


राज्यात निर्बंध बऱ्यापैकी शिथिल केले आहेत. त्यामुळे लोकांची गर्दी वाढतेय. दिवाळीनंतर तिसरी लाट जरी उद्भवली तरी लसीकरण हाच पर्याय असल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.