मुंबई : महानगरपालिकेच्या माध्यमातून भायखळा येथील राणीची बाग प्राणी संग्रहालयात प्राणी खरेदीची निविदा काढण्यात आली. मात्र, ही निविदा चढ्या दराने काढण्यात आली, असा आरोप भाजपने केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप नगरसेवक विनोद मिश्रा यांनी ही निविदा चढ्या भावाने काढली आहे. यामुळे मुंबईकरांच्या १०६ कोटी रुपयांवर डल्ला मारण्यात येत असल्याचा आरोप करतानाच ही निविदा रद्द करण्याची मागणीही केली होती.


नगरसेवक मिश्रा यांनी केलेला हा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लावून धरला. जिजामाता उद्यानातील सिंह आणि चित्ते यांच्यासाठी हे टेंडर काढण्यात आले. मात्र, यामधून मुंबईकरांची फसवणूक होत आहेच. हा पैसे कुणाच्या खिशात जाणार असा सवाल फडणवीस यांनी केला. 


तर, नगरसेवक मिश्रा यांनी याबाबत मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, या आरोपांमुळे अखेर ही टेंडर प्रक्रिया रद्द करण्यात आलीय. दरम्यान  आज भाजप पालिका गटनेते प्रभाकर शिंदे आणि काही माजी नगरसेवक यांनी राणीच्या बागेची पाहणी केली.