मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची सतत वाढणारी संख्या राज्याची चिंता वाढवणारी आहे. आज दिवसभरात राज्यात 11,111 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर गेल्या 24 तासात 288 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात राज्यात 8837 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 6 लाखांच्या जवळ पोहचली आहे. सध्या राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 5 लाख 95 हजार 865 इतका झाला आहे. त्यापैकी आतापर्यंत 4 लाख 17 हजार 123 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची दिलासादायक बाब आहे. गेल्या आठवडाभरापासून राज्याचा रुग्ण दर काही प्रमाणात सुधारला आहे. राज्यातील सध्या रुग्ण बरे होण्याचं प्रमाण-रिकव्हरी रेट 70 टक्के इतका आहे. 



राज्यात आता एकूण 1 लाख 58 हजार 395 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत 20037 जण दगावले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट काहीसा सुधारला असला, तरी मृत्यूदर अजूनही घटलेला नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.36 टक्के इतका इतका आहे. 


राज्यात आतापर्यंत एकूण 31,62,740 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. आताच्या घडीला राज्यात 10,53,897 जण होम क्वारंटाईनमध्ये असून 38,203 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.