मुंबई : कर्जमाफीसाठीचे आतापर्यंत १०  लाख ११ हजार शेतक-यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेयत. तर १२ लाख ३८ हजार शेतक-यांनी नोंदणी केलीय. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी याबाबत माहिती दिलीय.


 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७  च्या कर्जमाफीसाठी राज्यात एकूण २६ हजार केंद्रांवर अर्ज भरण्यात आले. सर्व शेतक-यांचे अर्ज ऑनलाईन भरून होईपर्यंत ही केंद्र सुरू राहणार आहेत. मागच्या आठवड्यापासून जवऴपास रोज एक ते सव्वालाख शेतक-यांची नोंदणी होतेय असंही देशमुखांनी यावेळी सांगितलं.