Mumbai News : काही दिवसांपूर्वी स्वीडनमध्ये (Sweden) पुरातत्व विभागाला जमिनीखाली गाडली गेलेली 20 घरं, त्यांचे अवशेष आणि त्या घरांमध्ये असणारा खजिना सापडला. उत्खननातून बाहेर आलेल्या या खजिन्याची चमक पाहता अगदी सहजपणे त्याच्या आताच्या किमतीचा अंदाज लावता येत होता. यासंदर्भातली चर्चा थांबत नाही, तोच याच घटनेशी काहीसं साधर्म्य असणारी गोष्ट मुंबईत पाहायला मिळाली. (130 years old tunnel Found in J J Hospital read details)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील जे.जे. रुग्णालय (J J Hospital) परिसरात असणाऱ्या डी.एम. पेटीट नावाच्या साधारण 130 वर्षे जुन्या इमारतीमध्ये एक भुयार सापडलं. सदर भाग हा नर्सिंग क़ॉलेजचा आहे. पण, तिथं सापडलेल्या या भुयारामुळं आता अनेकांचीच उत्सुकता आणि कुतूहल शिगेला पोहोचलं आहे. 


बुधवारी रुग्णालय परिसराची पाहणी करत असताना निवासी वैद्यकिय अधिकाऱ्यांना संशयास्पद गोष्टीचा अंदाज आलाय ज्यानंतर त्यांनी कुतूहलाचा भाग म्हणून तिथे असणारं झाकण काढण्याचा प्रयत्न केला. झाकण निघताच तिथं काहीशी पोकळी असल्याचं त्यांना जाणवलं. 


वाचा : बापरे! जमिनीखाली सापडलेला खजिना पाहतच राहिले लोक, 20 घरांमध्ये सापडलं....


दिसणारी पोकळी नेमकी कशाची आहे हे पाहण्यासाठी म्हणून त्यांनी सुरक्षा रक्षकांच्या सहाय्यानं पुढील पाहणी केली आणि तिथं असणाऱ्या भुयाराचा (Tunnel) थांगपत्ता लागला. हे भुयार साधार 200 मीटरचं असून, इमारतीचं आयुर्मान पाहता ते 130 वर्षे जुनं असल्याचं सांगण्यात आलं आहे. 


सर जे जे रुग्णालयाची वास्तू आणि सदरील भागामध्ये बऱ्याच ब्रिटीशकालीन (British) इमारती आहेत. त्यातच आता सापडलेलं भुयार पाहता आता मुंबई जिल्हाधिराऱ्यांकडे (Mumbai Collector) यासंदर्भातील माहिती सोपवण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी सेंट जॉर्ज परिसरातही असंच भुयार सापडलं होतं. मुंबईत (Mumbai) अशा प्रकारचं भुयार सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीची शहरातील काही भागांतून भुयारं, चोरवाटा सापडल्या होत्या. तेव्हा आताच JJ Hostpital मधील या भुयारातून नेमकी कोणत्या रहस्याची उकल होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.