बापरे! जमिनीखाली सापडलेला खजिना पाहतच राहिले लोक, 20 घरांमध्ये सापडलं....

अपघात म्हणा किंवा आपत्ती, काही कारणास्तव जमिनीखाली गाडली गेलेली ती घरं अखेर जगासमोर आली. पण, जे वास्तव समोर आलं ते हादरवणारं होतं.   

Updated: Nov 2, 2022, 10:57 AM IST
बापरे! जमिनीखाली सापडलेला खजिना पाहतच राहिले लोक, 20 घरांमध्ये सापडलं....  title=
archaeologists found silver treasure in sweden during excavation

World News : स्वीडनची (sweden) राजधानी, स्टॉकहोम (stockholm) येथे टेबी प्रांतात सुरु असणाऱ्या उत्खननामध्ये पुरातत्वं विभागाला (archaeologists ) वर्षानुवर्षांपूर्वी जमिनीखाली गेलेल्या गोष्टी सापडल्या आहेत. उत्खननामध्ये सापडलेल्या या गोष्टी खजिन्याहून कमी नाहीत. कारण, यामध्ये बहुविध प्रकारच्या दागदागिन्यांचा समावेश आहे. पुरातत्वं विभागाच्या माहितीनुसार इथं उत्खननातून 20 घरांचे अवशेष हाती लागले. यामध्ये जवळपास 1 हजार वर्षांपूर्वीचा एक असा दागिना हाती लागला ज्याची चमक नव्याप्रमाणं होती. (archaeologists found silver treasure in sweden during excavation)

स्टॉकहोमपासून काही अंतरावर असणाऱ्या टेबीमध्ये सुरु असणाऱ्या उत्खननामध्ये तब्बल 20 घरं आणि इमारतींचे अवशेष सापडले. यामध्ये एका इमारतीच्या फरशीखाली सापडलेल्या अवशेषांनी अनेकांना चक्रावून सोडलं. फरशीची अवस्था अतिशय वाईट झालेली असली तरीही तिथं असणारे दागदागिने मात्र सुस्थितीत होते. 

प्राचीन काळातील चांदीचे दागिने पाहून पुरातत्वं विभागही हैराण 

उत्खननातून मिळवण्यात आलेल्या ऐवजामध्ये चांदीचे 8 नेक रिंग (गळ्यात घालायची आभूषणं), दोन बाजूबंद, एक अंगठी, दोन माळा आणि 12 मुद्रा मिळाल्या ज्यांचा वापर त्या काळात बहुदा पेंडंट म्हणून केला जात होता. हे सर्व दागिने एका मातीच्या भांड्यात ठेवण्यात आले होते. 

अधिक वाचा : पुढच्या 48 तासांत जगावर आणखी एका युद्धाचं सावट; 'या' देशांमध्ये पडलीये ठिणगी 

भांड्यातून दागिने जेव्हा बाहेर काढण्यात आले तेव्हा ते सुस्थितीतच होते. त्यांची चमक ही एखाद्या नव्या दागिन्याप्रमाणे होती. (excavation) उत्खननातून मिळालेल्या मुद्रा वायकिंग काळातील असल्याचं सांगत प्रत्यक्षदर्शी आणि या मोहिमेक सहभागी असलेल्यांनी सांगितलं. सापडलेल्या मुद्रा इंग्लंडसह इतरही देशांशी संबंधित आहेत. 

स्टॉकहोम विद्यापीठातील प्रा.  Jens Christian Moesgaard यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार अशा मुद्रा, नाणी 18 व्या शतकातील जुन्या पुस्तकांमध्ये पाहिल्या गेल्या होत्या.