Viral Video, मुंबई : मुंबईची लाईफलाईन म्हणजे लोकल ट्रेन. दिवसाला लाखो प्रवासी लोकल ट्रेनने(Mumbai local train) प्रवास करत असतात. यात महिला प्रवाशांची संख्या देखील लक्षणीय आहे. रात्रीच्या वेळेस लोकलने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. या प्रश्नाचे उत्तर मुंबई लोकलमधील एका व्हायरल व्हिडिओ(Viral Video) मध्ये सापडले आहे.  ‘नृत्या गिरी’ या इन्स्टाग्राम(instagram) अकाउंटवरून एका तरुणीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. रात्रीच्या वेळेत महिलांचा प्रवास सुरक्षित आहे की नाही ते या तरुणीने या 15 सेकंदच्या व्हिडिओतून सांगितले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा ती रात्री उशीरा प्रवास करते... असं कॅप्शन या तरुणीने व्हिडिओला दिले आहे. इन्स्टाग्राम रील्सवर या व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पोलिस जवान पाठमोरा उभा राहिलेला दिसत आहे. जेव्हा ती रात्री उशीरा प्रवास करते... यावेळेस पोलिस दादा तिचे संरक्षण करण्यासाठी हजर असतो. रात्रीच्या वेळेस पोलीस जवान महिला डब्यात तैनात असल्याने महिला प्रवासी सुरक्षित आणि बिनधास्त प्रवास करु शकतात हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा या तरुणीने प्रयत्न केला आहे. 


मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर महिला मोठ्या संख्येने प्रवास करतात. रात्रीच्या वेळेस गर्दी कमी असल्याने महिलांच्या डब्यात फारसे प्रवासी दिसत नाहीत. यामुळे रात्रीच्या वेळेस प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेच्यातिन्ही मार्गावर पोलीस जवान तैनात असतात. रात्रीच्या वेळेस महिला डब्यांमध्ये पोलिस कर्मचारी पहायला मिळतात. 


यामुळेच या तरुणीने व्हिडिओच्या माध्यमातून पोलिस जवानांचे आभार मानले आहेत. पोलिसांमुळेच रात्रीच्या वेळेस महिला सुरक्षित प्रवास करु शकतात हे या तरुणीने व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे. तीच्या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनेकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. तर, अनेकांनी त्यांना सलाम देखील केला आहे.  


 


 


<



>