Mumbai Rape: मुंबईत चुलत्याने आपल्या 15 वर्षाच्या अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी काकाने कपडे घेण्याच्या बहाण्याने पुतणीला मैत्रिणीच्या घरी बोलावलं होतं. यानंतर शीतपेयात गुंगीचं औषध मिसळून आधी बेशुद्ध केलं आणि नंतर बलात्कार केला. इतकंच नाही तर बलात्कार करतानाचा व्हिडीओही त्याने शूट केला. या नराधम काकाला आरसीएफ पोलिसांनी अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेंबूरमध्ये 15 वर्षीय मुलीच्या शितपेयात गुंगीचं औषध टाकून बेशुद्धावस्थेत बलात्कार करण्यात आला. वाशीनाका चेंबूर येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. चुलत काकानेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(2)(1), 65 (1) आणि 123 तसंच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या कलम 4, 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला कपडे घेऊन देण्याच्या बहाण्याने चेंबूर स्थानकात बोलावलं होतं. यानंतर तिला आपल्या मैत्रिणीच्या घरी घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर त्याने तिला गुंगीचं औषध मिसळलेलं शीतपेय पिण्यासाठी दिलं. 


पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुंगीचं औषध प्यायल्याने पीडिता बेशुद्ध झाली होती. यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. इतकंच नाही तर आरोपीने बलात्कार करताना व्हिडीओ शूट केला आणि तो व्हायरल देखील केला. पोलीस सध्या हा व्हायरल व्हिडीओ हटवण्याचा प्रयत्न करत आहे. तसंच आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.