मुंबई : पदोन्नतीपासून डावलण्यात आलेल्या १५४ उपनिरीक्षकांना मोठा दिलासा मिळालाय. १५४ पोलीस उपनिरीक्षकांची एमपीएससीतर्फे घेण्यात आलेली परीक्षा ही पदोन्नतीसाठी नव्हती तर ती सरळसेवा भरतीसाठी होती, असं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनं 'मॅट'मध्ये सादर केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१५४ पोलीस उपनिरीक्षकांना दिलेल्या आश्वासनांप्रमाणे त्यांची नियुक्ती पोलीस उप-निरीक्षक पदावर करत असल्याचे सरकारनं मान्य केलंय. 


न्यायालयात या १५४ जणांची नियुक्ती पत्रे सादर करण्याचे मॅटनं आदेश दिले आहेत. आज मॅटमध्ये यासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.