मुंबई : बस स्टॉपवर विजेचा धक्का बसल्यामुळे वरळीतील 16 वर्षीय मुलास जीव गमवावा लागला आहे. वरळी आरे डेरी समोरील बस स्टॉपवर ही घटना मंगळ वारी घडलीये. या प्रकरणी वरळी पोलीस अधिक तपास करत आहेत.मात्र झालेल्या घटनेमुळे वरळी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

10 ची परीक्षा देऊन निकालाच्या प्रतीक्षेत असणारा प्रतीक मंगळवारी त्याच्या मित्रांसोबत वरळी सी फेस इथे समुद्राच्या लाटांचा आनंद घेण्यासाठी गेला होता. लाटांच्या पाण्यात भिजल्यानंतर प्रतीक वरळी डेरीसमोरील बस स्टॉपवर थांबला. मात्र या बस स्टॉपवर जाहिरातींसाठी सुरू असलेल्या विजेचा शॉक लागून प्रतीक जागीच कोसळला. हा विजेचा धक्का एवढा प्रचंड होता की प्रतीकला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. प्रतिकच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे


बेस्टच्या बस स्टॉपवर जाहिरातीचे कंत्राट घेताना त्यात सुरक्षिततेबाबत योग्य खबरदारी न घेतल्याने ही घटना झाली. त्यामुळे दोषींवर कारवाई व्हावी शिवाय बेताची परिस्थिती असणाऱ्या बामणे कुटुंबियांना बेस्ट प्रशासनाने आर्थिक मदद करावी अशी मागणी युवा सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे.


येत्या काही दिवसातच पावसाला सुरवात होईल.त्यावेळी आसरा म्हणून अनेक जण बस स्टॉप चा आधार घेतात मात्र झालेली घटना पाहता बेस्ट प्रशासनाने तात्काळ पावलं उचलणं गरजेचं आहे.