नवी दिल्ली : मुंबईतील १९९३ सालच्या बॉम्ब स्फोटातील दोषींना आज शिक्षा सुनावण्यात आली. मुंबईच्या विशेष टाडा कोर्टाने ताहिर मर्चेंट आणि फिरोज खानला फाशीची शिक्षा सुनावली. तर अबू सालेम आणि करीमुल्ला शेखला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यासोबतच रियाज सिद्दिकीला १० वर्षाची शिक्षा मिळाली असून कोर्टाने सालेम आणि करीमुल्लाला २-२ लाख रुपये दंड आकारला आहे. या प्रकरणात दाऊद इब्राहिम, टायगर मेमनसोबतच ३३ लोकं अजूनही फरार आहेत. अबू सालेम. मुस्तफा डोसासोबत मुख्य ७ आरोपी होते. सालेमला पोर्तुगालमधून डिपोर्ट करून आणण्यात आलं आहे. 


या १० मुद्यांनी जाणून घ्या अबू सालेमला कशी मिळाली जन्मठेप 



१) सीबीआयने अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.


२) टाडा कोर्टाचे म्हणणे होते की, मुस्तफा डोसा, अबू सालेम, ताहिर मर्चेंट आणि फिरोज खान मुख्य प्लानर आहेत. ज्यांनी या घटनेचा संपूर्ण आराखडा तयार केला. 


३) गुजरातवरून हत्यारे घेऊन जाण्याच्या आरोपावरून अबू सालेमला २००२ मध्ये पोर्तुगालमध्ये अटक केली होती. त्याचप्रमाणे अभिनेता संजय दत्तला देखील हत्यार देण्यासाठी तोच कारणीभूत होता. ज्याने या प्रकरणात एके- ५६ रायफलच्या अवैध ठेवण्याबाबत आरोप लगावला होता. 


४) अबू सालेमला २००५ मध्ये पोर्तुगालकडून भारतात आणण्यात आले होते. 


५) महत्वाची बाब म्हणजे त्याला पोर्तुगालमधून भारतात आणले तेव्हा ही अट ठेवण्यात आली होती की, त्याला फाशीची शिक्षा होणार नाही. 


६) एप्रिल १९९५ साली मुंबईतील टाडा कोर्टाने ही सुनावणी सुरू केली. २००० सालापर्यंत सर्व साक्षिदारांचे स्टेटमेंट संपले. त्यानंतर २००१ मध्ये समोरच्या पक्षाचे सर्व मुद्दे मांडण्यात आले. २००३ साली या प्रकरणातील सर्व सुनावणी पूर्ण झाली. 


७) २००६ साली कोर्टाने १२३ आरोपींवर निर्णय देण्यास सुरूवात केली. ज्यामध्ये १२ आरोपींना फाशी आणि २० आरोपींना जन्मठेप सुनावण्यात आली.  यासोबतच कोर्टाने ६८ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावून २३ लोकांना निर्दोष मुक्त केलं. 


८) सात आरोपींमध्ये सालेम, मुस्तफा डोसा, करीमुल्ला खान, अब्दुल रशीद खान, रियाज सिद्दीकी, ताहिर मर्चेंट आणि अब्दुल कय्यूम शामिल होते. या सातही जणांना २००३ ते २०१० या वर्षांमध्ये अटक करण्यात आले होते. 


९) कोर्टाने अबू सालेमसह इतर ६ जणांना दोषी करार दिला. एका आरोपीला सोडण्यात आले होते. सीबीआयने पाच दोषींपैकी तिघांना मृत्यूदंडाची आणि दोघांना जन्मठेप सुनावली आहे. 


१०) अबू सालेम आणि करी मुल्लाहला २ - २ लाखाचा दंड आकारण्यात आला आहे.