मुंबई : १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषींना आज टाडा कोर्टानं शिक्षा सुनावली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणातील मोहम्मद ताहिर मर्चेंट आणि फिरोज अब्दुल राशिद खान यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तर अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आलीय. याचं कारण म्हणजे भारत-पोर्तुगालमध्ये झालेला प्रत्यार्पण करार... सालेमला भारतात प्रत्यार्पित केलं गेलं. त्यावेळी सालेमला भारत फाशीची शिक्षा सुनावणार नाही या अटीवर लिस्बन कोर्टानं भारताकडे सोपवलं होतं. शिवाय त्याला २५ वर्षांपेक्षा अधिक तुरुंगवासाची शिक्षाही या करारामुळे सुनावण्यात येऊ शकत नाही, असं त्याच्या वकिलांचं म्हणणं होतं.


करिमुल्लाला जन्मठेप आणि दोन लाख रुपयांची शिक्षा दिली गेली... करीमुल्लाहनं हा दंड भरला नाही तर त्याला आणखीन दोन वर्ष तुरुंगात काढावे लागतील. सालेमचा आणखीन एक साथीदार रियाझ सिद्दीकी याला १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


शिक्षा सुनावणीनंतर दोषींच्या पायाखालची जमीन सरकली. फिरोजला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्याला सांत्वना देण्यासाठी सालेमनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तेव्हा मानसिकदृष्ट्या कोसळलेल्या फिरोजनं सालेमचा हात झटकून टाकला. 


यावेळी फिरोज, सालेम आणि इतर दोषींच्या डोळ्यात पाणी दिसत होतं.