मुंबई : राज्यात आज 2 हजार 33 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे आज राज्यात 749 रुग्ण कोरोनातून बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आज दिवसभरात 51 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 35 हजार 58वर पोहचली आहे. तर आतापर्यंत एकूण 8 हजार 437 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 25 हजार 392 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


राज्यात आतापर्यंत 1249 जण कोरोनामुळे दगावले आहेत.


मुंबईत 1185 नवे कोरोनाबाधित आढळले असून 23 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण संख्येपैकी एकट्या मुंबईतच कोरोनाचे 21 हजार 335 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यापैकी आतापर्यंत 757 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. 


उद्धव ठाकरेंच्या भाषणातील १० महत्त्वाचे मुद्दे


सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतही रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. आज धारावीत 85 नवे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे धारावीत कोरोनाबाधितांची संख्या 1327वर गेली आहे. दाटीवाटीने राहणाऱ्या या भागात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या मुंबईसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. 


बीकेसीतील कोरोना रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांकडून लोकार्पण


दुसरीकडे दादरमध्ये आज 14 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. दादरमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 173 इतका झाला आहे. माहिममध्ये 28 रुग्ण वाढले असून एकूण 221 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.