Coronavirus :भारतीय नौसेनेत कोरोनाचा अटॅक, एकाचवेळी २० जवानांना लागण
आयएनएसमधील जवानांना कोरोनाची लागण
मुंबई : देशात वेगाने पसरत असलेल्या कोरोना व्हायरसने आता आणखी रौद्र रूप धारण केलं आहे. या कोरानाची भारतीय नौसेनेतील (Indian Navy) २१ जवानांना लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम नौसेना कमानीच्या तटावर असेलल्या लॉजिस्टिक आणि एडमिनिस्ट्रेटिव सपोर्ट बेस INS आंग्रेवर २१ जणांमध्ये कोरोना व्हायरस आढळला आहे. INS आंग्रे ही मुंबईत आहे.
या जवानांना आता नौसेनेच्या रूग्णालयात दाखल केलं आहे. नौसेनेत कोरानाशी संबंधीत हे पहिलं प्रकरण आहे. एकाचवेळी एवढ्या जवानांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्या लोकांची तपासणी केली जात आहे. हे सर्व जवान INS आंग्रे येथे असलेल्या त्यांच्या रूममध्ये राहत होते.
तपासात अशी माहिती मिळाली की, लॉकडाऊनमुळे हे सर्व जवान आपापल्या घरीच होते. बाहेर कुणाच्याही संपर्कात आले नव्हते. मात्र अद्याप ही माहिती मिळाली नाही की INS आंग्रेत येणाऱ्या कुणा अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे की नाही.
कोरोनाबाधित या जवानांना आता मुंबईतील नौसेना रूग्णालय आयएनएचएस अश्विनीमध्ये क्वारंटाइन करण्यात आलं आहे. नौसेनेच्या जवान कोरोनाबाधित झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तब्बल २१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.