1) पिंपरी चिंचवडच्या सांगवीत भरघाव फॉर्च्युनर घुसली थेट भोजनालयात. एकाचा जागीच मृत्यू.तीन जण गंभीर जखमी, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद 2) नाशिकमध्ये साखरेच्या पाकात पडलेल्या तीन वर्षांच्या मुलीला वेळेत उपचार न मिळाल्यानं मृत्यू.....डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप...संतप्त नातेवाईकांकडून सदगुरू रुग्णालयाची तोडफोड.3) पुण्यात बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू,  ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे बांधकामासाठी खणलेला खड्डा ठरला मृत्यूला सापळा. 4) नागपूरमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ, 75 वर्षीय सुरक्षा रक्षकाचा खून करून पेट्रोलंपावरून 12 लाखांची लूट. दरोडेखोरांनी सीसीटीव्ही रेकॉर्डही पळवलं. 5) नांदेड पोलीस भरती भ्रष्टाचारप्रकरणी आरोपींकडून 20 लाख जप्त, लेखी परीक्षेत गुण वाढवण्यासाठी घेतले होते पैसे. प्रवीण भटकरसह पाच आरोपी अजुनही फरार 6)डी के जैन यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती, मेधा गाडगीळ आणि सुधीर श्रीवास्तवांची सेवाज्येष्ठता डावलत जैन यांची वर्णी. 7)सीबीएसई आणि आयसीएसीईला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्रात स्वतंत्र आंतरराष्ट्रीय बोर्ड स्थापणार, विनोद तावडेंची घोषणा, एसएससीपेक्षा कठीण अभ्यासक्रम तयार करणार.8)नागपूरपाठोपाठ पुण्यातही मेट्रोच्या माध्यमातून जपणार सांस्कृतिक आणि पारंपारिक प्रतिक....संभाजी पार्क आणि डेक्कनमध्ये उभारणार मावळ्यांच्या पगडीच्या आकाराचं स्टेशन. 9)कर्नाटकच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींची उडी, पाच दिवसांत पंधरा सभा घेणार....अमित शाह 30 तर योगी आदित्यानाथांच्या 20 सभा, राहुल गांधी घेणार कर्नाटकच्या प्रचारानंतर पंधरा दिवसांचा ब्रेक.10 ) अ‍ॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉरची भारतीयांना भूरळ, पहिल्या तीन दिवसात बॉक्सऑफिसवर 100 कोटींची कमाई,