मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता प्रदुर्भाव पाहता राज्य त्याचबरोबर केंद्र सरकारने संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हाता पोट असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपला मोर्चा गावाकडे वळवला आहे. लॉचडाऊनमुळे कोणत्याही प्रकारची वाहतूक सेवा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांनी आपल्या गावी पायी जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कामगारांनी रस्त्यांवर एकच गर्दी केली. परिणमी सरकारला राज्याच्या आणि जिल्हाच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. तरी देखील हे कामगार छुप्या मार्गाने घरी जात असल्याचं दिसून आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, कर्नाटकातील दोन हजार ४४२ कामगार मुंबईत अडकले होते. ते अखेर घरी परतले आहते. कर्नाटक सरकारनं पाठवलेल्या बसेसमधून कामगारांना घरी सोडण्यात आलं. या संदर्भातील ट्विट वृत्तसंस्था एएनआयने केलं आहे. सरकारने वारंवार सांगून देखील कामगारांनी गावी जाण्याचा मार्ग अवलंबला. गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारने ६२ बस कामगारांना गावी सोडण्यासाठी तैनात केल्या होत्या. देशात त्याचप्रमाणे राज्यात देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. 



राज्यात आतापर्यंत एकूण कोरोनाचे २०७ रुग्ण असून त्यातील ८ जणांचा मृत्यू झालाय. यात मुंबईतील ८५ रुग्ण आणि ६ मृतांचा समावेश आहे.  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारकडून देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनचा परिणाम दिसत असून नवीन रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची गती कमी झाल्याचं चित्र आहे. 


 कोरोना व्हायरसच्या अपडेटसाठी बनवण्यात आलेल्या covid19india.org या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांच्या वाढीची संख्या कमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.