मुंबईकरांसाठी कालचा रविवार ठरला फेब्रुवारीतला सर्वात उष्ण दिवस
सरलेला रविवार यंदाच्या उन्हाळ्याची चाहूल घेऊन आलाय. रविवारी मुंबईत यंदाच्या फेब्रुवारीतला सर्वात उष्ण दिवस नोंदवण्यात आला.
मुंबई : सरलेला रविवार यंदाच्या उन्हाळ्याची चाहूल घेऊन आलाय. रविवारी मुंबईत यंदाच्या फेब्रुवारीतला सर्वात उष्ण दिवस नोंदवण्यात आला.
सांताक्रुज वेधशाळेनं नोंदवलेल्या तापमानानुसार रविवारी उपनगरात पारा 37.6 अंशांवर पोहोचला. तर दक्षिण मुंबईतही 36.5 अंश सेल्शियस कमाल तापमानाची नोंद झाली.
सामान्य तापमानापेक्षा रविवारचं तापमान 5 ते 6 अशांनी जास्त आहे. येत्या काही दिवसात तापमान चढेच राहण्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय.