मुंबई : मुंबईवर झालेल्या २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज ९ वर्ष पूर्ण झाली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्ताननं घडवलेल्या या हल्ल्यामध्ये अनेक निष्पाप पोलिस कर्मचारी, नागरिक आणि लष्करी अधिकार्‍यांचा मृत्यू झाला आहे. मुंबईवरील या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना आज पोलिसांनी श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. 


दक्षिण मुंबईतील मरीन लाईन्स येथे आज विशेष सरकारी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेआहे. राज्यपाल, मुख्यमंत्री सह अनेक वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आहे.  


मास्टर माईंड मोकाट  


२६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफीज सईदला नजरकैदेतून मुक्त करण्याचा निर्णय पाकिस्तानने जाहीर केला आहे. 


भारताने सतर्क राहण्याची गरज 


भारतासोबत पाकिस्तानचं छुप युद्ध सुरू आहे. त्यामुळे सीमेवर आणि देशांर्गत सुरू असलेल्या अनेक छुप्या कारवायांबाबत मात्र भारताने सतर्क राहण्याची गरज आता वाढली आहे.