मुंबई : राज्यात आज दिवसभरात २७३९ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात १२० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात २२३४ रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण ३७ हजार ३९० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या राज्यात ४२ हजार ६०० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ८२ हजार ९६८वर पोहचली आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत राज्यात २९६९ जणांचा मृत्यू झाला आहे.


देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मुंबईत आज १२७४ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. मुंबईत ४७ हजार ३५४ कोरोनाग्रस्त असून १५७७ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत १९ हजार ९७७ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या २५ हजार ७९४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 



मुंबईतील खाजगी रुग्णालयांवर आता आयएएस अधिकाऱ्यांची करडी नजर


राज्यातील रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा रिकव्हरी रेट ४५.०६ टक्के इतका आहे. तर राज्यातील मृत्यू दर ३.५७ टक्के आहे.


'कोरोनाच्या गंभीर रुग्णांनाच बेड मिळावा', मुंबईच्या महापौरांचं वक्तव्य