मुंबई : दिवसा ढवळ्या घरफोडी करणाऱ्या नेपाळी घरफोड्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. राहुल थापा असं आरोपीचं नाव आहे. तो २०१० मध्ये जामिनावर सुटला होता. घरफोडी करून मिळवलेला पैसा तो मॉडेलिंगसाठी पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी वापरत होता. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या  युनिट ३ ने कारवाई करत राहुल थापाला अटक केली आहे . 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई, ठाणे, पनवेल, न्हावाशेवा, उरण सारख्या परिसरात ३० घरफोड्या करणाऱ्या राहुल थापाला ऐरोली परिसरातून अटक केली आहे. आरोपी सीसीटीव्ही नसलेल्या व वयोवृद्ध वॉचमन असलेल्या इमारतींची रेकी करायचा. घरफोडी करण्यासाठी हा आरोपी नेहमी दुपारी १२ ते ४ हीच वेळ निवडायचा. 


राहुल थापा  ऐरोली परिसरात  रेकी करण्यास येणार असल्याचे कळताच युनिट ३ ने सापळा रचून त्यास अटक केली आहे.


अटक केलेल्या आरोपीने २००७ ते २००८ मध्ये पवई परिसरात तब्बल २० घरफोड्या केल्याचे समोर आले आहे. २०११ मध्ये अटक झाल्यानंतर जामिनावर सुटल्यावर या आरोपीने पुन्हा मुंबईच्या बाहेर घरफोड्या करण्यास सुरुवात केली होती.