उद्यापासून मध्य रेल्वेवर 314 तर पश्चिम रेल्वेवर 296 लोकल फेऱ्या वाढणार
लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणखी दिलासा
मुंबई : उद्यापासून सध्या लोकलने प्रवास करणाऱ्या लोकांना आणखी दिलासा मिळणार आहे. कारण रविवारपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेवर लोकलच्या एकूण 2020 फेऱ्या होणार आहेत.
सध्या मध्य रेल्वेच्या 706 फेऱ्या सुरू आहेत. ज्यामध्ये आता आणखी 314 फेऱ्या वाढवल्या जाणार एकूण फेऱ्या 1020 होणार आहेत. तर पश्चिम रेल्वेच्या सध्या 704 फेऱ्या सुरू आहेत. ज्यामध्ये आणखी 296 फेऱ्यांची भर पडणार असून आता एकूण 1000 लोकल फेऱ्या होणार आहे.
कोविडच्या संदर्भातील सर्व सूचनांचे पालन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाचे केले आहे. मुंबईत रेल्वे रुग्णांची होणार वाढ कमी झाली असली तरी अजून नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे सध्या अत्यावश्यक सेवेतील आणि सरकार कर्मचाऱ्यांनाच रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हळूहळू सरकारकडून यामध्ये वाढ करत आहे.