मुंबईत वाढदिवसाच्या केकमधून ३५ जणांना विषबाधा
केक खाल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल
मुंबई : दहीसरच्या कांदरपाडा भागात वाढदिवसानिमित्त कापलेला केक खाल्ल्यामुळे उलटी, जुलाब, ताप असा त्रास होऊ लागला.य ातील काही जणांना भगवती रुग्णालयात तर काहींना अंधेरीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुलीच्या पहिलाच वाढदिवसाच्या निमित्ताने आणलेल्या केकमधून ही विषबाधा झाली आहे.
भगवती रुग्णालयात एकूण २० जणांना दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी केक शॉप सील करण्यात आलं आहे. मंगळवारी रात्री वाढदिवसानिमित्त आणण्यात आलेला केक खाल्यामुळे काही जणांना याचा त्रास होऊ लागला. यात ११ महिला आणि ९ पुरुषांचा समावेश आहे. रुग्णांमध्ये १ वर्षाच्या चिमुरडीसह आईचाही समावेश आहे.
सर्वांनाच ताप, उलटी, जुलाब होत आहेत. दरम्यान काही जणांना अंधेरीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.