मुंबई : पावसामुळे मुंबई विमानतळ बंद पडल्यामुळं नागरिकांचे हाल होत आहेत. बालीहून मुंबईला येणारे एअर आशियाचे विमान रद्द करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील 35 लोक बाली विमानतळावर अडकून पडले आहेत. पुढचे विमान कधी येणार याची काहीही माहिती त्यांना मिळत नाहीये त्यामुळे व्यापारसाठी गेलेल्या या लोकांचे हाल सुरु आहेत. तब्बल 6 तास हे लोक विमानतळ वर काही सोया होईल का या प्रतीक्षेत आहेत.


पावसाचा फटका हवाई वाहतुकीला देखील बसला आहे. नागपूरहून मंगळवारी रात्री निघालेली दोन ते तीन विमाने मुंबई विमानतळावर न उतरताच परत नागपुरात आली. मुंबई विमानतळाच्या रनवेवर पाणी साचल्याने व व्हिजिबिलिटी कमी असल्याने विमानांना लँडिंग करता आले नाही. नागपूर विमानतळावर माघारी आलेल्या विमानाच्या प्रवाशांना योग्य सुविधा मिळत नसल्याने नागपूर विमानतळावर या प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली आहे.