मुंबई : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून नियमावली जाहीर केली आहे. याद्वारे काही बंधंन घालण्यात आली आहेत. या नव्या पाहुण्याचा भारतात प्रसार होऊ नये, यासाठी विमानतळावर कसून चौकशी केली जात आहे. (466 passengers from 13 countries have arrived in Mumbai airport) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान उद्रेक असलेल्या 13 देशातून 15 दिवसांमध्ये मुंबई विमानतळावर 466 प्रवासी आले. यातील 97 प्रवाशी हे मुंबईतील आहेत. तर यातील एकही जण पॉझिटिव्ह आढळलेला नाही, अशी माहिती मिळाली आहे. 



तेव्हा आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत गेलेले 97 जण हे मुंबईतील असल्याची माहिती मिळतेय. मात्र सुदैवाने एकही पॉझिटिव्ह सापडला नाही. दरम्यान राज्यात लॉकडाऊन नको असेल, तर आरोग्याची बंधन पालावीच लागतील, असं आवहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.