मुंबई : Major Car Accident on Mumbai's Bandra Worli sea link : वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात झाला आहे. आज पहाटे सी-लिंकवर चार कार आणि रुग्णवाहिका यांच्यात हा अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.


या अपघतात बारा  जण जखमी झाले होते.  वांद्रेहून वरळीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला.  एका मागून एक अशा चार गाड्या एकमेकांवर आदळल्या. पहाटे साडे तीनच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला मागून येणाऱ्या तीन गाड्यांनी जोरदार धडक दिली. रुग्णवाहिकेला आणि अपघातग्रस्त गाडीला धडकल्या. गाड्या एका पाठोपाठ आदळल्याने वाहनांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.