मुंबई : मायानगरीतील सर्वात महागडं आणि भव्य हॉटेल म्हणजे 'ताज हॉटेल'. मुंबईतचं नाही तर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यावर राहणाऱ्या व्यक्तीची इच्छा असते ती म्हणजे एकदा तरी ताजमध्ये रहावं. पण आताच्या महागाईच्या दिवसांत हे सर्व सामान्यांसाठी फार खर्चीक आहे. पण एक काळ असा होता जेव्हा ताज हॉटेलमध्ये राहण्यासाठी फक्त 6 रूपये मोजावे लागत होते. महिंद्रा एन्ड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केलेला फोटो ताज हॉटेलच्या जुन्या जाहिरातीचा आहे.  शिवाय त्यांनी या फोटोला एक कॅप्शन देखील दिलं आहे. 'महागाईवर मात करण्यासाठी उत्त पर्याय. टाईम मशिनच्या माध्यमातून जुन्या दिवसांत जाऊ. ते दिवस देखील काय दिवस होते जेव्हा ताजमध्ये राहण्यासाठी फक्त 6 रूपये मोजावे लागत आहे.'


ताज हॉटेलमधील हे दिवस 1903 सालचे आहेत. जेव्हा ताजमध्ये एक रात्र राहण्यासाठी फक्त 6 रूपये मोजावे लागत होते. सध्या महिंद्रा यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर आताच्या महागाईच्या तुलनेत ते दिवस खरंच सोनेरी दिवस होते.