मुंबई : मुंबईतील अंधेरी परीसरातील सेव्हन हिल रूग्णालयात ६० वर्षीय कोरोनाबाधित रूग्णाने आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा वृद्ध कोरोनाबाधित रूग्ण विक्रोळी पूर्व परिसरात राहात होते. या रूग्णाने रूग्णालयाच्या नवव्या मजल्यावर गळफास लावून आत्महत्या केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अगोदर १५ एप्रिल रोजी २९ वर्षीय महिला कोरोना पॉझिटीव्ह आली. तिने देखील बीव्हायएल नायल रूग्णालयात आत्महत्या केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वॉर्ड क्रमांक २५ च्या बाथरूममध्ये तिने स्वतःच्या ओढणीने गळफास लावून घेतला. 


राज्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या २० हजारांपर्यंत पोहोचली आहे. फक्त मुंबईतच कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ही १२ हजारांवर पोहचली आहेत. मुंबईत ४६२ रूग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.  


धारावीतही रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.  २५ नवे रूग्ण धारावीत वाढले असून धारावीत आता एकूण कोरोना रूग्णांची संख्या ८३३ वर पोहोचली आहे. यामध्ये मृतांचा आकडा २७ आहे. 


दिलासादायक बाब म्हणजे धारावीत २२२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून ते ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहे. माहिममध्ये ५ रूग्ण वाढले असून तिथं एकूण कोरोना रूग्णसंख्या ११२ झाली आहे. ज्यात ५ मृत्यू तर २८ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. 



सीआरपीएफमध्ये नवे ६२ कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. आता एकूण आकडा २३४ असून कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढते.