सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई : ज्या वयात आज अनेक वृद्ध व्यक्ती पोथी आणि पुराण वाचतात. त्या वयात कमल आजींनी दहावीची पुस्तक हातात घेऊन ५० टक्के गुण मिळवले आहेत. त्यांच्या शिकण्याच्या या जिद्दीला सलाम करण्यासारखी ही गोष्टी आहे. कमल काशिनाथ शिंदे-पवार या ६० वर्षाच्या आजीने यंदा एसएससी बोर्डाची परीक्षा दिली आणि या आजी ५० टक्के गुण मिळवून यशस्वी झाल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लहानपणापासून कमल आजी यांना शिक्षणाची आवड होती. परंतु वडिलांची मिल बंद पडली. घरची परीस्थिती गरीबीची होती. म्हणून ७ वीतच शिक्षण सोडावं लागलं. त्यानंतर हातातील पुस्तक दूर गेली आणि घरोघरी जाऊन धुणीभांडीची काम त्या करू लागल्या. हे सर्व सुरू असतानाच कमल ताई यांचं लग्न झालं. मुलबाळ आणि संसार यात त्या रमल्या. परंतु मनात शिक्षणाची ओढ कायम होती. कमल आजींना दोन मुलं आहेत. 


कमल आजींची दोघेही मुलं उच्चशिक्षित असुन नोकरी करतात. कमल यांना अडीच वर्षाची नात आहे. मुलं आपापल्या वाटेने यशस्वी झाल्यानंतर या माऊलीने शिक्षणाला नव्याने सुरुवात केली.


सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करणाऱ्या कमल यांची ४० वर्ष शिक्षणापासून नाळ तुटली. मग वयाच्या ५६ व्यावर्षी त्यांनी ८ वीला प्रवेश घेतला आणि ६० ल्या वर्षी अहिल्याबाई नाईट हायस्कूल मधून दहावीचा फार्म भरला. घरकाम स्वतःची छोटेखानी कॅटरींगचा व्यवसाय चालवत केवळ रोजचा दोन तास रात्रशाळेतील अभ्यास यावरच त्यांनी दहावीची तयारी केली. आपल्या या यशाचे श्रेय त्या शिक्षकांना, कुटुंबीयांना आणि स्वत:च्या मेहनतीला देतात.


अगदी लहान ‌अपयशाने देखील आज तरुण निराश होतात. पण कमल आजींनी मात्र वयाच्या ६०व्या वर्षी बोर्डाच्या परीक्षेत ५० टक्के गुण मिळवत वेगळा आदर्श घडवला आहे. शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते हे आपल्या कृतीतून त्यांनी सिद्ध केले आहे.