माय मुंबई आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाला जोरदार प्रतिसाद, यांचा गौरव
सहाव्या माय मुंबई आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाला जोरदार प्रतिसाद मिळाला.
मुंबई : सहाव्या माय मुंबई आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाला जोरदार प्रतिसाद मिळाला. या महोत्सावाला खास इराण, इराक, बांगलादेश या देशांतील फिल्ममेकर्सची विशेष उपस्थिती लाभली. स्पर्धेत 'समीरा', 'प्रॉन्स', 'टूलेट' आणि स्पेन च्या 'टू रिमेम्बर मी बाय' या लघुपटांनी अधिकाधिक पारितोषिके पटकावली. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार 'रित्विक सहोरे' तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार 'हिमानी त्यागी' हिला देण्यात आला. सहोरे या अभिनेत्याने यापूर्वी हिंदी चित्रपट 'दंगल' या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका बजावली आहे.
जगभरातील ६ उपखंडातून १५०० हून अधिक लघुपटांचा प्रतिसाद मिळालेला ६ वा माय मुंबई आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव 'युनिव्हर्सल मराठी' आणि 'रितंभरा विश्व विद्यापीठा च्या मालिनी किशोर संघवी कॉलेज' यांच्या संयुक्त विद्यमानाने मुंबईच्या जुहू किनाऱ्याजवळील मालिनी किशोर संघवी शांतीप्रभा प्रेक्षागृहात मोठ्या दिमाखात झाला. या तीन दिवसीय महोत्सवात लघुपटकारांसाठी पॅनल डिस्कशन, स्क्रिप्टिंग वर्कशॉप, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चित्रपटसृष्टीतले तज्ञ, प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्मात्यांशी चर्चा आणि प्रश्नोतरे यासारख्या कार्यक्रमांची मेजवानी अनुभवयास मिळाली. महोत्सवात १५ वर्षाच्या नवोदितापासून ते ६५ वर्षाच्या अनुभवी लघुपटकारांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला होता. या महोत्सवाला नामवंत स्पर्धकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ज्येष्ठ दिग्दर्शक राज दत्त ह्यांनी महोत्सवाचे उद्घाटन केले तर महोत्सवातील पारितोषिक वितरण सोहळ्यात सिनेसृष्टीतल्या दिग्गजांची उपस्थिती लाभली. रामायण या पौराणिक मालिकेतील 'सीता' फेम 'दीपिका चिखलीया टोपीवाला'आणि महाभारत ह्या पौराणिक मालिकेतील 'मै समय हू' फेम 'हरीश भिमानी' ह्या वेळेला सोहळ्यात उपस्थित होते. त्यामुळे रामायण आणि महाभारत एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. रितंभरा विश्व विद्यापीठचे अध्यक्ष अश्विन मेहता, विश्वस्त किशोर संघवी, एमकेएस कॉलेज च्या प्रिंसिपल डॉ. कृष्णाबेन गांधी, फेस्टिवल ज्युरी हेड प्रा. चेतन माथूर, गुजराती 'नटसम्राट' चित्रपटाचे दिग्दर्शक 'जयंत गिलाटर', लाफ्टर चेलेंज फेम हास्य अभिनेता 'नवीन प्रभाकर', जाहिरात क्षेत्रातील नामांकित अभिनेता 'कांचन पगारे' या सर्व मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. यावेळी विजेत्यांना पारितोषिके आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.
वर्गवारीनुसार पारितोषिके
सामाजिक जनजागृती : टुलेट (दिग्दर्शक योगेश खंडाळे)
माहितीपट : दी गर्ल्स आर नॉट ब्राइड्स (दिग्दर्शक केम ताज-बिऊल हसन)
म्युझिक व्हिडिओ : त्या सांज किनाऱ्यापाशी (दिग्दर्शक कृणाल राणे)
कल्पनारम्य (फिक्शन) फिल्म : शमशान (दिग्दर्शक बिट्टू कुमार)
जाहिरातपट : कॅरी ऑन (दिग्दर्शक सुमीत पाटील)
ऍनिमेशनपट : गॉड डॅम (दिग्दर्शक अमेय पितळे)
आंतरराष्ट्रीय : कलर केज (दिग्दर्शक डॅनियल रेअस्कॉस)
स्पेशल ज्युरी : समीरा (दिग्द. स्वाती सेमवाल), प्रॉन्स (दिग्दर्शक स्वप्नील शेट्ये)
सोशल-फिक्शन विभागातील वैयक्तिक पारितोषिके
सर्वोत्कृष्ट लेखन : किरण विजय साष्टे (शॉर्टफिल्म : लाडू)
सर्वोत्कृष्ट संगीत : बहराम, टिनू अरोरा, झुबीन कठोर (शॉर्टफिल्म : समीरा)
सर्वोत्कृष्ट संकलन : राहुल दासवानी (शॉर्टफिल्म : टू रिमेम्बर मी बाय)
सर्वोत्कृष्ट छायांकन : अमित घाडीगावकर (शॉर्टफिल्म : प्रॉन्स)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन : योगेश खंडाळे (शॉर्टफिल्म : टू लेट)
सर्वोत्कृष्ट अभिनेता : रित्विक सहोरे (शॉर्टफिल्म : टू रिमेम्बर मी बाय)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : हिमानी त्यागी (शॉर्टफिल्म : १८+ त्रिशा)
डॉक्युमेंट्री विभागातील वैयक्तिक पारितोषिके
सर्वोत्कृष्ट लेखन : ओवेद गडकर (डॉक्युमेंट्री : दि अंडरग्राऊंड एजेंट)
सर्वोत्कृष्ट छायांकन : किशोर देवरे आणि श्रीनिवास गायकवाड (डॉक्युमेंट्री : फड)
सर्वोत्कृष्ट संकलन : विशाल सुवल्का (डॉक्युमेंट्री : डीजेबल टू डिफरेंट एबल)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन : अरुण काशीद (डॉक्युमेंट्री : स्वच्छता दूत)