मुंबई : कायम शूज विकत घेताना याचा पूर्ण विचार करा. नवीन शूज खरेदी करताना नेमकी कोणती काळजी घ्याल हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलांना कपड्यांमध्ये फार चॉईस मिळत नाहीत. पण शूजच्या बाबतीत तस मात्र नाही. शूजमध्ये मुलांना अनेक व्हरायटी मिळतात. पण अनेकदा कोणत्या कपड्यांवर कोणते शूज मॅच होतील याबाबत माहिती नसल्यामुळे अनेक अडथळा येतो. 


यासाठी आम्ही देतोय काही खास टिप्स 


१) डेनिम्ससोबत कधीच Shiny ब्लॅक शूज घालू नका 
डेनिम्ससोबत कधी कोणत्या गोष्टी वापरायच्या ही सर्वात महत्वाची बाब आहे. डेनिम्ससोबत तुम्हाला मॅटचे शूज जास्त चांगले दिसतील. तसेच डेनिम जर ऑफिस किंवा फॉर्मल प्रोग्रामसाठी वापरत असाल तर तुम्ही Shiny शूज कधीच वापरू नका. 


२) सँडल्ससोबत कधीच सॉक्स घालू नये 
आता तुम्ही म्हणाल ही तर फॅशन आहे. तर सँडल्ससोबत सॉक्स न वापरता फक्त फ्लोटससोबत ते वापरा. सॉक्स शूजसोबतच वापरा. आणि सॉक्स वापरताना देखील काळजी घ्या. कोणत्या रंगाचे सॉक्स वापरा. 


३) ऑफिस आणि कॅज्युअल ओकेजन्सवर व्हाइट सॉक्स घालू नका
 व्हाइट सॉक्स फक्त जिमिंग आणि रनिंगच्या वेळी घालावे असा एक अलिखित नियम आहेत. आपण विचार करतो की व्हाईट सॉक्स ही फॉर्मल आहेत. पण तसं नाही व्हाईट सॉक्स हे खास जिमिंग आणि रनिंगसाठी आहेत. ऑफिसमध्ये तुम्ही ब्लॅक किंवा ब्राऊन रंगाचे शूज वापरा. 


४) मॅचिंग सॉक्सचे टेंशन दूर करण्यासाठी एंकल लेंथ सॉक्स घालावे 
अनेकदा असा विचार केला जातो की ऑफिस किंवा कॅज्युअल ओकेजन्सला शूजला मॅचिंग असणारेच सॉक्स घालावते. मात्र तसं नाही. आणि ते टाळण्यासाठी आता बाजारात नव्याने आलेल्या अँकल लेंथच्या शूजचा देखील तुम्ही वापर करू शकता. 


५) आपल्या बुटांचे कलेक्शन वाढवा, चांगल्या बुटांमध्ये इन्वेस्ट करा 
मगाशी म्हटल्याप्रमाणे मुलांना शूजमध्ये अनेक कलेक्शन पाहायला मिळतात. आणि ते अनेकदा घातले जातात. त्यामुळे फक्त वर्षातून एकच शूज सगळ्या कपड्यांवर न वापरता तुम्ही अनेक प्रकारचे शूज वर्षभरात वापरा. यामुळे तुम्हाला व्हरायटी देखील मिळते आणि शूजची मर्यादा देखील वाढते. 


६) आपल्या वॉर्डरोबमध्ये Square शेपचे शूज ठेवू नका. हे Outdated आहेत. 
वॉर्डरोबमध्ये कायम नवीन कलेक्शन असणं गरजेचं आहे. त्यामुळे नवा ट्रेंड लक्षात घेऊन शॉपिंग करा. त्यामध्ये Square शूज खरेदी करणं प्रकर्षाने टाळा. आता बाजारात पॉईंटेड शूज आले आहेत. ते वेगवेगळ्या रंगात खरेदी करा.


७) आपल्या कलेक्शनमध्ये Different कलर्सचे लोफर्स ठेवा 
आपण पाहिले आहेत आता बाजारात वेगवेगळ्या रंगाचे लोफर्स आले आहेत. आणि लोफर्स हे कायम ट्रेंडी असतात. जीन्स, शॉर्टवरती तुम्ही हे लोफर्स वापरू शकतात. तसेच लोफर्स हे फार वेगवेगळ्या ब्रँडचे बाजारात उपलब्ध आहेत.