मुंबई :  रेल्वे प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेवर तब्बल 72 तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. या एकूण 72 तासांच्या 4 फेब्रुवारीपासून मध्यरात्रीपासून हा मेगाब्लॉक सुरु होणार आहे. या मेगाब्लॉकमुळे मुंबईतून राज्याबाहेर जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पुणे-मुंबई डेक्कन क्विन 4 दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे. (72 hour jumbo megablock on central railway cancellation of many express trains)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे ते दिवा मार्गावर पाचव्या आणि सहाव्या मार्गासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. ही काम झटपट पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेकडून हा जम्बो मेगाब्लॉक घेतला जात आहे. या जम्बो मेगाब्लॉकमुळे तब्बल 117 मेल एक्स्प्रेस गाड्या 3 दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. 


तसेच पुणे मुंबई डेक्कन क्वीन 4 दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे. राज्यात एका बाजूला एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. अगदीच मोजक्या प्रमाणात एसटी गाड्या आगारातून बाहेर पडत आहेत. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर राहणाऱ्या प्रवाशांची या 72 तासांमध्ये चांगलीच कसरत होणार आहे.