मुंबई: देशभरातील अनेक राज्यांतील काही भागात मुसळधार तर, काही ठिकाणी अगदीच कोरडाठाक अशी मान्सूनची स्थिती यंदा राहिली. यंदाच्या मान्सूनने अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला असला तरी, काहिंच्या आयुष्यात मात्र कारूण्याची झालर निर्माण केली आहे. यंदा मान्सूनने देशभरातून सुमारे ७७४ जणांचे बळी घेतले.


कोणत्या राज्यात किती बळी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या मान्सूनच्या मौसमात पावसाने देशभरात सात राज्यांना त़डाखा दिलाय. यात ७७४ जणांचा मृत्यू झालाय. केरळमध्ये १८७, उत्तर प्रदेशमध्ये १७१, पश्चिम बंगालमध्ये १७० तर महाराष्ट्रात १३९ जणांचा मृत्यू झालाय. गुजरातमध्ये ५२, आसाममध्ये ४५ जणांचा तर नागालँडमध्ये आणजणांचा मृत्यू झालाय. राष्ट्रीय आपत्कालीन केंद्र म्हणजेच एनईआरसीने जाहिर केलेल्या अहवालातून ही आकडेवारी समोर आलीय.


यंदाचा पाऊस आमच्या गावात पडलाच नाही!


दरम्यान, यंदाचा पाऊस देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार बरसला असला तरी, या राज्यांच्या काही भागात मान्सून अगदी कोरडा ठाक राहिला. त्यामुळे पाऊस न पडलेल्या ठिकाणी पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. काही ठिकाणी आताच टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु झाला आहे.