मुंबई : कॉंग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरणी मनसेच्या संदिप देशपांडेंसह ८ जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. सत्र न्यायालयाकडून हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. 


सर्जिकल स्ट्राईक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॉंग्रेस कार्यालयाची ही तोडफोड मनसेने केल्याचे समोर आले. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी याबाबत ट्विट केले आहे. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भैय्या संजय निरुपमच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक..’ असे ट्विट त्यांनी केले आहे. याप्रकरणी मनसेच्या देशपांडेंसह ८ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. 


जबाबदारी स्वीकारली 


गेल्या आठवड्यात काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना शिवाजीपार्क पोलिसांनी ताब्यात घेतले. 


काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाची तोडफोड मनसेकडून करण्यात आली होती. संदीप देशपांडे यांनी ट्विट करून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.


संजय निरूपमांची टीका 


तर या हल्ल्यावर मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली.


‘मनसेच्या नपुंसक कार्यकर्त्यांनी जेव्हा ऑफिसमध्ये कुणीच नव्हतं तेव्हा हल्ला केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई नाही केली तर मनसेला सडेतोड उत्तर दिलं जाईल’, असे ट्विट त्यांनी केले होते.