वसई : तुम्ही जर विरारच्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर फिरायला जाणार असाल तर सावधान... कारण या समुद्र किनाऱ्यावर कुत्र्यांच्या टोळीनं दहशत माजवलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेलेल्या अपूर्वा तांडेल या चिमुरडीवर कुत्र्याच्या टोळक्यांनी हल्ला चढवला. गुरूवारी अपूर्वा समुद्रकिनारी खेळत होती. अचानक पावसाच्या धारा बरसू लागल्याने अपूर्वा घरी जाण्यासाठी पळू लागली आणि तिच्या पळण्यावर समुद्रकिनारी असलेल्या कुत्र्यांच्या घोळक्याने हल्ला चढवला. 


अपूर्वाच्या अंगाचे लचके त्या १५ ते २० कुत्र्यांनी तोडले. किनाऱ्याजवळ असलेल्या इतरांनी बघितल्यावर तिला वाचविण्यासाठी लोकं धावले आणि ती थोडक्यात बचावली. 


समुद्रकिनारी असलेलं डम्पिंग ग्राऊंड, खराब मासे तसेच हॉटेलमधील उष्ट खाणं यामुळे इथे कुत्र्यांची संख्या वाढलीय. तर वसई विरार हद्दीत भटक्या कुत्र्यांना पकडून पालिका या समुद्र किनारी सोडत असल्याचा आरोप स्थानिक गावकऱ्यांनी केलाय.