९३ साखळी बॉम्ब स्फोट : आरोपींना फाशी देण्याची सरकारी वकीलांची मागणी
९३ साखळी बॉम्ब स्फोट खटल्यातील आरोपी ताहीर मर्चंट आणि करीमुल्ला खानला फाशी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील दीपक साळवी यांनी टाडा न्यायालयात केली.
मुंबई : ९३ साखळी बॉम्ब स्फोट खटल्यातील आरोपी ताहीर मर्चंट आणि करीमुल्ला खानला फाशी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील दीपक साळवी यांनी टाडा न्यायालयात केली.
टायगर मेमन एवढाच ताहीर आणि करीमुल्ला दोषी असल्याचं सांगत पाकिस्तानच्या आयएसआय, मिलेट्री आणि एअरफोर्शशी हे दोघंही संपर्कात होते.
तर तरूणांना दहशतवादाच्या ट्रेनिंगसाठी पाठविण्यात ताहीर आणि करीमुल्ला यांची मुख्य भूमिका असल्याचा युक्तीवाद सरकारी वकील दीपक साळवी यांनी केलाय.
एवढंच नाही तर ९३ साखळी बॉम्बस्फोटात ताहीर आणि करीमुल्ला यांचा दाऊदच्या बरोबरीने रोल होता.