मुंबईच्या समुद्रात बुडाली बोट!
मुंबई जवळील समुद्रात एक भीषण दुर्घटना घडली आहे. बालार्ड पिअर जवळ एका बोटीला जलसमाधी मिळाली आहे
मुंबई: मुंबई (Mumbai) जवळील समुद्रात एक भीषण दुर्घटना घडली आहे. बालार्ड पिअर जवळ एका बोटीला जलसमाधी (boat Accident) मिळाली आहे. ही एक मालवाहू बोट असल्याची माहिती समोर येत आहे. या बोटीवरील तिघांना वाचवण्यात यश आलं आहे. सुदैवाचीबाब म्हणजे या भीषण दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र जहाजाचे मोठं नुकसान झालं आहे.
या दुर्घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. अंगाचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ आहे. महत्त्वाचं म्हणजे शेजारी असणाऱ्या एका बोटीवरील कर्मचाऱ्याने हा व्हिडिओ काढला आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, बोटीला कशा प्रकारे जलसमाधी मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या बोटीच्या इंजिनामध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे बोटीमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली. काही कळण्याच्या आततच ही बोट समुद्रात बुडण्यास सुरुवात झाली. या मालवाहू बोटीवर तीन कर्मचारी होते. बोट बुडत आहे हे लक्षात येताच दोघांना पटकन समुद्रा उडी मारली आहे आणि आपला जीव वाचवला. त्यांनी शेजारी असणाऱ्या एका बोटीकडे पोहोत जाऊन सुरक्षितपणे आपला जीव वाचवला.
मात्र या बोटीवरील एक कर्मचारी अखेरच्या क्षणापर्यंत बोटीवर होता. मात्र आता कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नसल्याचं लक्षात येताच या कर्मचाऱ्याने देखील समुद्रा उडी मारुन स्वत:चे प्राण वाचवले. सध्या हा व्हिडिओ समाज माध्यामावर जोरदार व्हायरल होतोय.