Navi Mumbai Crime News : देशभरात थर्टी फस्टची धामधूम सुरु आहे. अशातच नवी मुंबईत(Navi Mumbai) एक भयानक घटना घडली आहे. एका पोलिस कर्मचाऱ्यानेच महाविद्यालीयन तरुणीचा विनयभंग केला आहे. सानपाडा(Sanpada) परिसरात ही घटना घडली आहे. जनतेचे रक्षक असलेले पोलिसच भक्षक बनले आहे. विशेष म्हणजे या पोलिस कर्मचाऱ्याने पोलिस गणवेशातच हे कृत्य केले आहे( college student was molested by a police constable). या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे(Navi Mumbai Crime News). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबईतील सानपाडा परिसरात हा  धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित तरुणी ही  आयआयटीची विद्यार्थीनी आहे. ती सानपाडा येथील एका इमारती बाहेर फेरफटका मारत होती. यावेळस तिच्यासह हा प्रकार घडला. पोलीस कॉन्स्टेबलने तिचा विनयभंग केला आहे. 


ही तरुणी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास आपल्या बॅचमेट सोबत सानपाडा येथे फेरफटका मारत होती. यावेळेस येथे पेट्रोलींग करत असताना एका पोलीस कॉन्स्टेबल कडून त्यांची विचारपूस करत मोबाईल क्रमांक मागण्यात आला. विद्यार्थ्यांनी मोबाईल क्रमांक देण्यास नकार दिल्यावर आरोपी पोलीस कॉन्स्टेबल दीपक राठोड ने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला. 


या प्रकरणी विद्यार्थिनीने सर्वप्रथम सानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सानपाडा पोलिसांनी पीडित विद्यार्थिनीला घाबरवत तक्रार न करण्याचा सल्ला दिला. पीडित विद्यार्थीनी आयआयटी कॉलेज कॅम्पस मध्ये आल्यावर तिने आपल्या डीनला घडला प्रकार सांगितला. 


पवई पोलीस ठाण्यात या घटने संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली. पवई पोलिसांनी कॉन्स्टेबल दीपक राठोड विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करत सदर गुन्हा सानपाडा पोलीस ठाण्यात वर्ग केला.  एका पोलीस कॉन्स्टेबलनेच आयआयटी विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याने संताप व्यक्त करण्यात येत असून नवी मुंबई पोलीस यावर काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.