Crime News : घाटकोपर (Ghatkopar) परिसरात भीषण दुर्घटना घडली आहे. खोल दरीत पडलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी तब्बल पाच थरारक बचाव कार्य सुरु होते. शेवटी हा व्यक्ती वाचलाच नाही. ही दरी जवळपास 50 फूट खोल आहे.  या घटनेमुळे घाटकोपर परिसारत डोंगरकड्यावर राहणाऱ्या नागरीकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लहू सखाराम खोत असे मृत व्यक्तीचे नाव आहे. घाटकोपर पश्चिम येथील भटवाडी हिल वरून पडून ते डोंगर कपारीत अडकलेले होते. सुमारे पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर त्यांना डोंगरावरून काढण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. मोठा दोर नसल्याने  तीन तास फक्त  बचाव कार्य ठप्प होते. 


लहू खोत हे भटवाडी हिल या डोंगराळ झोपडपट्टी मध्ये रहातात. या झोपडपट्टी च्या मागच्या बाजूला खोल दरी आहे. याच्या कोपऱ्यावर लहू खोत आले असता तोल जाऊन ते 50 फुट खाली खोल दरीत पडले. मात्र, ते डोंगर कपारीतच अडकून पडले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान दोरखंडाच्या मदतीने डोंगराच्या कपारीत उतरले. तब्बल पाच तास हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. खाली सुमारे आणखी पन्नास फूट खोल असल्याने हे रेस्क्यू ऑपरेशन अंत्यंत  भीतीदायक होते. अंधरामुळे खोत यांचा शोध घेताना अडचणी येत होत्या.


घाटकोपर पश्चिम येथे भडवाडी, असल्फा तसेच साकीनाका परिसरात डोंगरावर मोठ्या प्रमाणात घरे बांधण्यात आली आहे. लाखो लोक येथील डोंगर कपारीवर बांधण्यात आलेल्या घरांमध्ये राहत आहेत. डोंगरावर दाटीवाटीने घरं असल्यामुळे घरांपर्यंत जाणारे रस्ते अत्यंत निमुळते आहेत. यामुळे येथे दुर्घटना घडल्यास मदत कार्य पोहचण्यात अडथळा येतो.