मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) २०१९-२०२० या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प प्राधिकरणाच्या बैठकीत गुरुवारी मंजूर करण्यात आला. हा अर्थसंकल्प १६ हजार ९०९ कोटींचा असून महानगर प्रदेशातील दहा मेट्रो प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात ७ हजार ४८६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पामध्ये आरे येथे उभारण्यात येणाऱ्या मेट्रो भावनासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या भवनात प्रशिक्षण केंद्र, मेट्रो संचलन व नियंत्रण केंद्र, कार्यालये, कॅफेटेरिया प्रमाणेच सात रहिवाशी माजले असणार आहेत. मुंबई आणि महानगर प्रदेशातील १३  मेट्रो मार्गाचे नियंत्रण या मेट्रो भवनातून होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई परबंदर प्रकल्प आणि विरार-अलिबाग बहुद्देशीय मार्ग या दोन मोठ्या प्रकल्पांसाठी भरघोस तरतूद करण्यात आली आहे. पारबंदर प्रकल्पासाठी 3 हजार कोटी, विरार -अलिबाग बहुउद्देशीय मार्गासाठी २ हजार २५० कोटीची तरतूद केली आहे. सूर्य प्रादेशिक जलपुरवठा योजनेसाठी ७०४.२० कोटी तरतूद करण्यात केली असून ८८ किलोमीटर लांबीच्या पाइपलाइनद्वारे मीरा-भाईंदर आणि वसई-विरार महापालिका क्षेत्रामध्ये पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.


मोनोरेलचा वडाळा ते संत गाडगे महाराज चौक पर्यंतचा दुसरा टप्पा लवकरच सुरु करण्यात येणार आहे. यासाठी १५०  कोटींची तरतूद केली आहे. त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठाच्या कालीन परिसरात पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी ५४ कोटींची तरतूदही केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी २१० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये बाळासाहेब आंबेडकर स्मारकासाठी १६०  कोटीची तरतूद आहे.


 मेट्रो मार्गांसाठी करण्यात आलेली तरतूद


- वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १, साठी ९८ कोटी


- दहिसर ते डी.एन.नगर मेट्रो २ अ १  हजार ८९५


- डी.एन.नगर ते मंडाले मेट्रो २ ब ५१९ कोटी


- कुलाबा- वांद्रे-सिपज मेट्रो ३ साठी ६५०  कोटी


- वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ - १ हजार ३३७


- ठाणे- भिवंडी- कल्याण मेट्रो ५ - १५० कोटी


- समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो ६ - ८०० कोटी


- अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो ७ साठी १  हजार ९२१ कोटी


- गायमुख ते शिवाजी चौक मेट्रो १०- ५ कोटी


- वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो ११ - ५ कोटी 


- कल्याण- डोंबिवली-तळोजा मेट्रो १२ - ५  कोटी