मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ताफ्यातील गाडीचा सोमवारी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर Mumbai-Pune Expressway अपघात झाला. यावेळी शरद पवार Sharad Pawar यांच्या ताफ्यातील पोलिसांची एक गाडी जवळपास पलटी झाली. त्यामुळे थोड्यावेळासाठी सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. मात्र, सुदैवाने कोणताही गंभीर प्रकार घडला नाही.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'एएनआय' वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या गाड्यांचा ताफा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून जात असताना हा प्रकार घडला. यावेळी गाड्यांच्या ताफ्यातील एक पोलीस जीप नियंत्रण सुटून रस्त्यावर जवळपास पलटी झाली. मात्र, सुदैवाने या जीपच्या चालकाला फारशी दुखापत झालेली नाही. तर शरद पवार यांची गाडीही सुरक्षित असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली. 


मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ४ वाहनांचा विचित्र अपघात , २ जण जागीच ठार
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर सोमवारी सकाळी खोपोलीनजीक एक भीषण अपघात झाला. मुंबईकडे येणाऱ्या मांसाची वाहतूक करणाऱ्या कंटेनरने कारला धडक दिली त्यापाठोपाठ आणखी २ वाहने येऊन धडकली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे मुंबईकडे येणाऱ्या लेनवरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. त्यामुळे महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. खोपोली पोलीस आणि अन्य यंत्रणा अपघातस्थळी पोहोचून अपघातग्रस्त गाड्या बाजूला करण्याचे काम सुरू केले. अखेर तासभराच्या मेहनतीनंतर ही वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.