आदेश बांदेकर यांनी स्वीकारला सिद्धीविनायक मंदिर न्यासाचा पदभार
शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांची श्रीसिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाल्यानंतर आज मंगळवारी दुपारी त्यांनी पदाची सूत्रं स्वीकारली. यावेळी न्यासाचे अन्य पदाधिकारी तसंच बांदेकर यांचे कुटुंबियही उपस्थित होते.
मुंबई : शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांची श्रीसिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाल्यानंतर आज मंगळवारी दुपारी त्यांनी पदाची सूत्रं स्वीकारली. यावेळी न्यासाचे अन्य पदाधिकारी तसंच बांदेकर यांचे कुटुंबियही उपस्थित होते.
आदेश यांनी पदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर कुटुंबियांसमवेत श्रीसिद्धीविनायकाचे आशीर्वाद घेतले. यावेळी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी त्यांना नव्या कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
न्यासाचे अध्यक्ष म्हणून भाविकांची सेवा हाच भाव या सूत्रानं काम करणार असल्याचं बांदेकर यांनी यावेळी सांगितले. तसेच झी २४ तासच्या 'संघर्षाला हवी साथ' या कार्यक्रमावेळी अध्यक्षपदाचा योग कसा जुळून आला याचा किस्सा त्यांनीही सांगितला.