मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळीमधून निवडणूक लढवत पहिला विजय साकारला आहे. निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील पहिलेच व्यक्ती आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी रिंगणात उतरण्याची तयारी दाखवली आणि ते जिंकून ही आले. आदित्य ठाकरे यांच्याकडे आता शिवसेनेचं भविष्य म्हणून पाहायलं जात आहे. ठाकरी शैली आणि आवाज नसला तरी आदित्य ठाकरे यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. एक अभ्यासू नेते म्हणून त्यांच्याकडे पाहायलं जातं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदित्य ठाकरे यांचा जन्म 13 जून 1990 ला झाला. आदित्य ठाकरे यांना कविता लिहिण्याचा छंद आहे. आदित्य ठाकरे हे चांगल्या डिबेटसाठी ओळखले जातात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आई रश्मी ठाकरे यांचे ते लाडके आहेत.


आदित्य ठाकरे यांनी बॉम्बे स्कॉटिश शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यानंतर सेंट झेवियर्स कॉलेजमधून त्यांनी डिग्री घेतली आहे. त्यानंतर केसी लॉ कॉलेजमधून त्यांनी डिग्री घेतली आहे.


राजकारण आणि समाजसेवा करत असताना त्यांना एखादी कविता सुचली तर ती लगेच ते मोबाईलमध्ये लिहून काढता. my thoughts in white and black हे त्यांचं कवितांचं पुस्तक देखील 2007 साली प्रकाशित झालं होतं.


आदित्या ठाकरे यांच्या गाण्यांचा एक अलबम देखील लॉन्च झाला आहे. ज्यामध्ये कैलाश खेर, सुरेश वाडेकर, शंकर महादेवन, सुनिधी चौहान या सारख्या दिग्गजांनी गाणी गायली आहेत. तसेच आदित्य ठाकरे हे Mumbai District Football Association (MDFA)चे चेअरमन देखील आहेत.


विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर आदित्य ठाकरे हेच पुढचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असा दावा शिवसैनिकांकडून होत आहे. तर त्यांना उपमुख्यमंत्रीपद देखील मिळण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या एकूण 163 जागांवर भाजप तर 124 जागांवर शिवसेनेचे उमेदवार रिंगणात होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 122 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता.