मुंबई : शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि अभिनेत्री दिशा पटनी यांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे १३ जून रोजी  असतो. बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटनीने आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं एक ट्विट केलं. 'वाढदिवसाच्या शुभेच्छा, असाच चमकत राहा,' असं ट्विट दिशाने केलं आहे. तर त्यानंतर आदित्य ठाकरेंनीही दिशाला शुभेच्छा दिल्या आहेत. 




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘धन्यवाद दिशा. तू त्या ठराविक लोकांपैकी आहेस ज्यांना मी १३ जून रोजी वाढदिवसानिमित्त ‘तुलासुद्धा शुभेच्छा’ असं म्हणू शकतो. अशीच चमकत राहा आणि प्रगती कर’, असं ट्विट करत आदित्य ठाकरेंनी दिशाला  वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 


दिशा पटनी आणि आदित्य ठाकरे यांच्या मैत्रीबद्दल नेहमीच सोशल मीडियावर चर्चा असते. अवधूत गुप्तेंसोबत झालेल्या एका प्रश्नोत्तराच्या रंजक सत्रामध्ये आदित्य ठाकरेंना लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा तुमची दिशा चुकल्याचं उत्तर आदित्य ठाकरेंनी दिलं होतं.