मुंबई : भारतील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानीच्या घरी सध्या लगीन घाई सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानीचा मुलगा अकाश अंबानी आणि ईशा अंबानी यांच्या साथीदाराची माहिती देण्यात आली आहे.  आकाश श्लोका मेहतासोबत विवाहबंधनात अडकण्याची माहिती देण्यात आली. 


साखरपुड्याची तयारी सुरू  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही मीडीया रिपोर्ट्सनुसार श्लोका आणि आकाशचं लग्न 30 जूनला होणार असल्याची माहिती मिळाली आहे. यासाठी एक खास डिजिटल वेडींग कार्ड बनवले आहे. सध्या सोशल मीडियामध्ये ते व्हायरल होत आहे. 


डिजिटल कार्ड व्हायरल 


श्लोका आणि आकाशचा खास फोटोसह सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या कार्डमध्ये साखरपुड्याची तारीख, स्थळ,वेळ याबाबत माहिती दिली आहे. या रिपोर्टनुसार अ‍ॅन्टिलियामध्येच हा सोहळा पार पडणार आहे. 


 



24 मार्चला झाली खास पार्टी 


24 मार्च 2018 ला  गोव्यात एक प्री एंगेजमेंट पार्टी झाली. मुंबईत त्यानंतर सेलिब्रिटींसाठी खास पार्टी झाली. त्यामध्ये खेळ, बॉलिवूड, उद्योग जगतातील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.