मुंबई : मध्य रेल्वेवर आटगाव ते वाशिंद दरम्यान अप मार्गावर पादचारी उड्डाण पुलाचा गर्डर टाकण्यासाठी आज (शनिवार) आणि उद्या (रविवार) साडेपाच तासांचा ट्रॅफीक पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. रात्री 10.50 ते पहाटे 4.20 पर्यंत हे काम चालेल. या ब्लॉकमुळे उपनगरीय रेल्वेसेवेसह लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, सीएसएमटीवरून  रात्री 8.56 ला सुटणारी आसनगाव लोकल टिटवाळ्यापर्यंत चालवण्यात येईल. तर आसनगावहून रात्री 11.08 वाजता सुटणारी ठाणे लोकल रद्द करण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस, एलटीटी मनमाड गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.


दरभंगा-एलटीटी एक्सप्रेस, अमृतसर-सीएसएमटी, गोरखपुर- एलटीटी एक्सप्रेस, कुशीनगर एक्सप्रेस, शालीमार-एलटीटी एक्सप्रेस, हावडा-सीएसएमटी, नंदीग्राम एक्सप्रेस, अमरावती- सीएसएमटी, विदर्भ एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस, पंजाब मेल, हावडा-एलटीटी, दुरांतो एक्सप्रेस आणि मंगला एक्सप्रेस या नियंत्रीत केल्या जाणार आहेत. भुसावळवरून सुटणारी भुसावळ पुणे एक्स्प्रेस मनमाड दौंडमार्गे चालणार आहे.


इस्टर्न हायवेवर वाहतूक खोळंबली


ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झालीय. ठाण्याच्या दिशेने जाणा-या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. ठाणे- बेलापूर मार्गावरील कळवा-विटावा रेल्वे ब्रीजखाली मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. त्यामुळं त्याठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवण्याचं काम सुरू असल्यानं वाहतूक विभागानं ऐरोलीमार्गे ईस्टर्न एकप्रेस हायवेहुन ठाण्याकडे वाहतूक वळवल्यानं ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीचा ताण पडला. याचा फटका सीएसटीहुन ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांना देखील बसलाय. ईस्टर्न एकप्रेस हायवे मुलुंडपासून भांडुपपर्यत तसेच ऐरोली हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झालीय. त्यातच नाताळमुळे आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जातेय.