`मंत्री अनिल परब ED चौकशीला हजर राहणार नाहीत`, कारण की...
Anil Parab Ed Summoned : महाविकास आघाडीतील परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांना ईडीने समन्स बजावले आहे. मात्र परब आज चौकशीला हजर राहणार नाहीत.
मुंबई : Anil Parab Ed Summoned : महाविकास आघाडीतील परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांना ईडीने समन्स बजावले आहे. मात्र परब आज चौकशीला हजर राहणार नाहीत, असे कळवण्यात आले आहे. (Anil Parab summoned by ED in money laundering case)
पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे परब गैरहजर राहणार आहेत. त्यांना दापोली इथल्या रिसॉर्टशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी समन्स बजावण्यात आले आहे. यापूर्वी ईडीने अनिल परब यांच्याशी संबंधित मुंबई, पुणे, रत्नागिरीत छापे टाकत झाडाझडती केली होती. मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील साई रिसॉर्टवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता.
अनिल परब यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. या समन्सनुसार परिवहनमंत्री यांना आज बुधवारी चौकशीसाठी हजर राहणार का, याची उत्सुकता होती. (maharashtra transport minister anil parab summoned by ED in money laundering case)
काय आहे हे प्रकरण?
अनिल परब यांना दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी हे समन्स पाठवण्यात आले आहे. ईडीने परब यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला होता. तसेच परब यांच्या दोन निवासस्थानांसह सुमारे 7 ठिकाणी छापा टाकला होता. कोस्टल रेग्युलेटरी झोन (CRZ) नियमांचे उल्लंघन करुन बांधण्यात आलेल्या रिसॉर्टच्या संदर्भात हा गुन्हा दाखल करण्यात आला.
संजय राऊत यांची जोरदार टीका
ईडी चौकशीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना असो वा इतर कोणताही पक्ष असो, जे लोक परखड भूमिका मांडतात, पक्षवाढीसाठी काम करतात, अशा सगळ्यांना केंद्रीय तपास यंत्रणा त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. राजकीय सूड, राजकीय बदला, राजकीय द्वेष उगवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे, असे आरोप राऊत यांनी यावेळी केला. गेल्या तीन दिवसांपासून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची चौकशी सुरू आहे, असे प्रकार आणखी काही दिवस सुरुच राहतील, असे ते म्हणाले.